अफगाणी तालिबान : आत्तापर्यंत १२९ भारतीयांची सुटका

16 Aug 2021 10:14:29

s_1  H x W: 0 x
 
नवी दिल्ली : तालिबानी संघटनेने आता जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतला आहे. याचे पडसाद जगबह्रा उमटले आहेत. विशेष म्हणजे तेथील अडकलेल्या भारतीयांचे काय? असा प्रश्न पडला असताना भारत सरकारने प्रत्येक भारतीयाला मायदेशी आणण्याची जबाबदारी उचलली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील दूतावासात काम करणारे कर्मचाऱ्यांसहीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन 'एअर इंडिया'चं एक विशेष विमान भारतात दाखल झाले.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावासातील आपले कर्मचारी आणि काबूलमधील भारतीय नागरिक यांच्या जिवाला सरकार कुठलाही धोका उद्भवू देणार नाही आणि त्यांनी तातडीने हलवणे भाग पडल्यास त्यासाठीच्या योजनेला आधीच अंतिम रूप देण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, आजची काही विमाने भारताकडून पाठवण्यात येणार असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0