हिमाचलमध्ये भीषण दुर्घटना: बसवर कोसळला डोंगरकडा

11 Aug 2021 17:22:50

himachl pradesh_1 &n
 
 
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील किन्नूरमध्ये एका प्रवासी बसवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी भरलेल्या बसवर ही दरड कोसळली आहे. तसेच या दरडीमध्ये इतर अन्य वाहनेही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये किमान ४० - ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता पोलीस उपायुक्त होसेन सिद्दकी यांनी व्यक्त केली आहे. तसेच, अद्याप ३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार रेकाँग पिओ- शिमला मार्गावर हा अपघात झाला आहे. चौरा आणि किन्नूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. या महामार्गावरील एक डोंगर कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढीगाऱ्याखाली सापडली आहे. ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग पाचवर झालेली ही दुर्घटना छील जंगलाच्या परिसरात घडली आहे. या दुर्घटनेमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0