चीनने इस्रायलवर केला सर्वात मोठा सायबर अटॅक

11 Aug 2021 11:37:18

istrayel_1  H x
जेरूसलेम : चीनने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर अटॅक केला आहे. चीनने आधी कधीही इस्रायलवर सायबर अटॅक केला नव्हता. भारत आणि इतर देशांवर हे आक्रमण केले गेले आहे,परंतु पहिल्यांदा चीनने इस्रायलवर हे आक्रमण केले आहे.चीनवर याआधी सायबर अटॅकचे आणि हॅकिंगचे आरोप आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या एक्सचेंज सर्वर हॅक केल्याचा फार मोठा आरोप चीनवर आहे. जो बायडेन या बाबतीत चीनवर क्रोधीत आहेत,तसेच चीनने या अशा कारवाया लवकर बंद कराव्या अशा सूचनाही त्यांनी चीनला वारंवार दिल्या होत्या.


युरोप पासून सर्व देश चीनच्या या कारवायांना त्रासले आहेत. अशावेळेस चीनने आता इस्रायेलवरही आक्रमण करण्यास सुरुवात केलेले आहे.मात्र यावेळेस चीनच्या या हॅकर्सनी इराणवर इस्त्राएलची शंका जावी यासाठी फारसी भाषेचा वापर केलेला आपल्याला दिसून येत आहे. परंतु सायबर अटॅक संदर्भित फायरआय या कंपनीने हे जाहीर केले आहे की हि हॅकिंग चीनकडून झाली आहे. या हॅकिंगमुळे देशाच्या अनेक गुप्त गोष्टी काढल्या जातात. चीन आपल्या देशातील अशा काही हॅकर्सना पकडते,आणि कंत्राट पद्धतीवर त्यांच्याकडून काम करून घेते.


 


 
Powered By Sangraha 9.0