आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

10 Aug 2021 16:27:24

Balaji Tambe_1  
 
 
मुंबई : योग आणि आयुर्वेदाचे अभ्यासक आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे मंगळवारी वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आयुर्वेदामधील महाराष्ट्रातील मोठे नाव हरपल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्यावर अन्त्यासास्कर करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे.
 
 
 
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांची थोडक्यात ओळख
 
 
योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी गेली कित्येक वर्षं बालाजी तांबे कार्यरत होते. विविध वृत्तपत्र, मासिके आणि इतर माध्यमांतून या विषयातले प्रबोधन करत होते. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर अनेक लेख लिहिले. आयुर्वैदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं मोठे कार्य त्यांनी गेली अनेक वर्षं केले.
 
 
 
बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले होते. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.
 
 
 
Powered By Sangraha 9.0