आता दरवर्षी ७ ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा करणार

10 Aug 2021 15:30:54

Javelin_1  H x
 
 
नवी दिल्ली : टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक २०२१मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. यावेळी भारताने ७ पदके पटकावली. यामध्ये ४ कांस्य, २ रौप्य आणि एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. तब्बल १३ वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले. भालाफेकपटू नीरज चोप्राने ही कामगिरी केल्यानंतर आता देशात दरवर्षी ७ ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघ योजना आयोगाने ही घोषणा केली आहे.
 
 
भारतीय अॅथलेटिक्स महासंघ योजना आयोगाचे अध्यक्ष ललित भनोट यांनी यावेळी सांगितले की, "अॅथलिट फेडरेशन ऑफ इंडियाने निर्णय घेतला आहे की, भालाफेक खेळाला चालना मिळावी, यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. यात दरवर्षी ७ ऑगस्ट हा दिवस ज्या दिवशी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. हा दिवस भालाफेक दिन म्हणून देशात साजरा करण्यात येईल."
 
 
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रासह सर्व खेळाडूंचा सन्मान केला. डिस्कस थ्रो कमलप्रीत कौर, सुवर्णपदक विजेता भारताचा फेकणारा नीरज चोप्रा आणि माजी धावपटू अंजू बाबी जॉर्ज दिल्ली येथे झालेल्या अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0