केंद्रात राणे पॅटर्न : सलग दुसऱ्या दिवशीही कामांचा धडाका

    दिनांक  09-Jul-2021 17:16:24
|

rANE _1  H x W:
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर नव्याने मंत्रीपदाचा स्वीकार करणाऱ्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सलग दोन दिवस कामांचा धडाका लावला आहे. शुक्रवारी त्यांनी विविध विभागाचे प्रेझेन्टेशन पाहून सखोल चर्चा केली. विभागाच्या कामाची गती व आवाका वाढविण्याच्या सूचना केल्या.
 rANE _2  H x W:

 
गुरुवारी पहिल्याच दिवशी राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची चर्चा आहे. राणेंच्या कामाची पद्धत महाराष्ट्राला आहेच, पण पहिल्याच दिवशी केंद्रातील अधिकाऱ्यांनी याचा अनुभव घेतला. राणेंनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच पहीली बैठक बोलावली होती. त्याबैठीकीची तयारी अधिकाऱ्यांनी फारशी केली नव्हती. ही बाब राणेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांची कार्यशैली पाहून अधिकारीही भांबावल्याचे दिसून आले.
 


rANE _3  H x W:
 
 
राणेंनी पहिल्या दिवशी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रीया देताना म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून मला जी संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. लॉकडाऊनमध्ये उद्योगांवर आलेल्या संकटांची मला जाण आहे. त्या दृष्टीने भविष्यात निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.