मुंबई : कोरोनाकाळामध्ये मुंबई शहरात सामाजिक कार्य केलेल्या व्यक्ति आणि संघटनांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या डॉ.रोहित केंजळे यांचा अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दरवर्षी पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे राबवले जातात. त्याच अनुषंगाने या महामारीच्या काळात देवदूत ठरलेले डॉक्टर, अधिकारी, समजसेवक तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी सन्मान देवदूतांचा हा सोहळा पत्रकार संघातर्फे नुकताच सन्मान करण्यात आला होता.