कोकणातील सड्यांवरील किटक भक्षी वनस्पती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2021
Total Views |
konkan_1  H x W


पावसाच्या सरी बरसू लागल्यावर हंगामी फुलांचा बहर फुलायला सुरुवात झाली आहे. या बहरामध्ये अनेकाविध प्रजातींचे फुले पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यातील लेखातून आपण पावसाच्या पहिल्या सरींनंतर फुलणार्‍या फुलांची आणि वनस्पतींची माहिती घेतली. या लेखातून आपण पाऊस स्थिरस्थावर झाल्यानंतर बहरणार्‍या फुलांची माहिती घेणार आहोत...
 
 
 
प्रतीक मोरे (देवरुख) -  पावसाच्या सरी बरसू लागल्यापासून निसर्ग बहरू लागला आहे. यामध्येच एखाद्या ऋषीसारखा ध्यानस्थ बसलेल्या कातळ सड्यांची समाधी भंग झाली आहे. या सड्यांवर नानाविध वनस्पतींचे कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. सीतेची आसवे, निळी पापणी अशा वनस्पती या सूक्ष्मजीव भक्षण करण्यासाठी अनुकूलित झाल्या आहेत. यांच्या खोडावर आणि जमिनीखाली मुळांवर विशिष्ट प्रकारची जठरे असतात. हे अवयव सूक्ष्मजीव पकडून त्यांचे पचन करण्यासाठी या वनस्पतींना मदत करतात. दवबिंदूसारख्या वनस्पती या हातासारख्या अवयवांना असणार्‍या चिकट द्रव पदार्थाने कीटक अडकवून त्यांचे भक्षण करतात. तुतारी आणि बंबाखू वनस्पती इतर वनस्पतींच्या मुळावर उगवतात आणि त्यातून त्यांचा अन्नरस शोषून घेऊन आपले उदरभरण करतात. दीपकाडी, आम्री, रानहळद या कंद वर्गीय वनस्पती एकदा का पाऊस संपला की, सुप्तावस्थेत जाऊन जमिनीच्या पृष्ठभागाखाली कंद तयार करुन आपला जीवनक्रम व्यतित करतात. यासर्व वनस्पती कितीही काटक, कणखर असल्या, तरी त्यांची फुलं एकदम विपरित म्हणजे सुंदर, नाजूक आणि रंगीबेरंगी असतात.
 
 
 
कीटक आणि सूक्ष्मजीव भक्षी
गवती दवबिंदू (Drossera indica)
पोषण मूल्यांची कमतरता, मातीचे अत्यल्प प्रमाण आणि पाण्याचा लहरीपणा यावर मात करण्यासाठीचे अजून एक अनुकूलन म्हणजे वनस्पतींचे कीटकभक्षण. गवती दवबिंदू ही अशीच एक कीटकभक्षी वनस्पती कोकणात अगदी सगळ्या सड्यावर, माळरानं आणि गवती भागात दिसून येते. तशी ही वनस्पती भारत, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अशा तीनही खंडात आढळते. मात्र, कोकणातील कातळ सड्यावर चांगलीच फोफावते. नावाप्रमाणेच याची पाने दवबिंदूप्रमाणे चकाकणारी चिकट द्रवाचे बिंदू धारण करणारी आणि एखाद्या पुराणराक्षसाच्या पंज्याच्या आकाराचे ‘टेंटाकल्स’सारखे भाग असणारी असतात. या भागांवर कीटक खाद्य समजून आकर्षित होतात आणि चिकटून बसतात. त्यानंतर सावकाशपणे ही वनस्पती या कीटकांना पचवते आणि आपली पोषण द्रव्ये मिळवते. गवती दवबिंदूची भगिनी असणारी बर्मी दवबिंदूसुद्धा काही ठिकाणी आढळते. अशा प्रकारे सापळे लावून जीवांना अडकवून पकडणार्‍या वनस्पतींचे अनुकूलन वैशिष्ट्य पूर्ण आहे. हरित द्रव्याची कमतरता भरुन काढण्यासाठी असे अनुकूलन आढळून येते. असे असले तरी या वनस्पतीची फुलं मात्र आखीवरेखीव सुंदर गुलाबी रंगाची असतात.
 
 
 
सफेद मुसळी किंवा फोडशी
Common name: Edible Chlorophytum
Botanical name: Chlorophytum tuberosum
सड्यावर सुरुवातीच्या पावसात येणारी अजून एक वनस्पती जी तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. रानभाज्या म्हणून हीची पाने मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. कंद पारंपरिक औषधी म्हणून वापरले जातात. या प्रजातीचे औषधी उपयोग भारतामध्ये मधुमेह, हगवण, मुतखडा आणि लैंगिक समस्या आदी विकारांमध्ये केले जातात. या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक पदार्थ जसे की, saponins, tannins, glycosides, alkaloids, flavonoids, phenolics, triterpenes, triterpenenoids, gallotannins आढळत असल्यामुळे हीचा वापर जंतुनाशक, पोटाच्या विकारावर उपयुक्त अशा पद्धतीने केला जातो. हिच्या कंदापासून पीठ बनवून त्याची भाकरी वनवासी लोक करत असल्याचे दिसून येते.
 
 
 
युट्रीक्युलेरिया ( utricularia किंवा bladderwort)
ही वनस्पती निळी पापणी, जठरी, कावळ्याचे डोळे, कावळ्याचे फूल अशा अनेक जाती आणि नावांनी ओळखली जाते. संथ वार्‍याच्या झुळकेने डोलणारी जांभळ्या निळ्या रंगाची फुलं जणू सड्यांना निळा शालू पांघरला आहे की काय, अशी जाणीव करून देतात. सुंदर एक पाकळी असलेल्या निळ्या जांभळ्या फुलांनी वार्‍याबरोबर डुलत राहावं. पावसाबरोबर झिम्मा खेळावा आणि चार-आठ दिवसांनी मातीमोल व्हावं, हा त्यांचा आयुष्यक्रम. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही ’युट्रीक्युलेरिया’ या जातीतील सूक्ष्म जीवाहारी वनस्पती आहे. हीचे वर्तन शिकारी असून या वनस्पती अतिसूक्ष्म जीव जसे की आदिजीव (protozoa) तसेच इतर सूक्ष्म जलचर यांना फसवतात आणि पचवतात. हे सर्व कातळखाली होत असते. जांभा दगडांवर माती कमी असल्याने पोषणमूल्य आणि नत्र तसेच क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठीचे हे उत्परिवर्तन दिसून येते. या वनस्पतीमध्ये निळी पापणी (रेटीक्युलाटा), पानपापणी (स्टेल्यारिस), चिरे पापणी (स्ट्रायट्युला) ही विविध जातींची फुले सह्याद्रीत सापडतात. अंदाजे सात सेंटिमीटर उंच वाढणार्‍या या रोपाच्या नाजूक फुलांखाली खोड आणि मुळांवर सूक्ष्म छिद्र आणि दाट केस असणारी जठरं असतात. ही अतिसूक्ष्म जीवांना फसवून अडकवतात आणि सावकाश पचवतात. सुंदर आणि नाजूक फुलं ही या वनस्पतीचा सर्वात सुंदर आणि आकर्षक भाग. काही फुलं जांभळी काही निळी तर काही पांढरी असतात. रंगद्रव्य जितक्या प्रमाणात यानुसार हे रंग दिसतात. पांढर्‍या फुलांमध्ये रंगद्रव्य पूर्णतः नसतात. तशी ही चिखलात वाढणारी आणि जमिनीलगत पसरणारी वनस्पती असल्याने पानं, खोड, मूळ अशी विभागणी दिसून येत नाही. तिचा बराचसा भाग पाण्यात बुडून राहत असल्यामुळे पाण्याखालच्या जीवनाला ही वनस्पती अनुकूल झालेली आढळते. झाडाचे खोड नाजूक असून stolon नी बनलेली असतात आणि त्यावर दोरीसारखे थोडे आणि जाळ्यांसारखे थोडे भाग असतात. या जाळीचा वापर करुन ही वनस्पती पाण्यामधले सूक्ष्म जलचर पकडते आणि उरलेले हिरवे भाग फोटो सिंथिसिसने अन्न बनवण्याचे काम करत असतात. तसेच stolon वर असणारे जठरासारखे सापळे देखील शिकारीमध्ये मदत करतात. असं सर्व असूनही यांच्या उमलणाच्या काळात दिसणारं दृश्य आणि सड्याचे होणार विहंगम परिवर्तन या वनस्पतींना महत्त्व देऊन जातात. अनेक ठिकाणी तर पर्यटन उद्योग या वनस्पतीच्या उमलण्यावर अवलंबून आहे. कोकणात गौरीच्या सजावटीमध्ये काही ठिकाणी ही फुलं वापरली जातात. रत्नागिरीमधील चंपक मैदान असेल किंवा आदिष्टीच पठार या फुलांची निळाई या पठरांच सौंदर्य कैक पटीने वाढवते.
 
 
मूळ परजीवी
बंबाखू (Striga gesnerioides)
बंबाखूही मूळ परजीवी (Root parasite) वनस्पती कोकणातील सडे आणि कास पठारावर सहज दिसून येते. खरं तर परजीवी असल्याकारणाने अनेक पिकांची ही तशी तण म्हणून मानली जाते. म्हणूनच की काय, हिला इंग्रजीमध्ये purple witchweed म्हणून ओळखले जाते. चवळी किंवा इतर legume वर्गीय वनस्पती पिकांची ही परजीवी. मात्र, सड्यावर आढळणार्‍या indigofera या वनस्पतीची परजीवी म्हणून प्रामुख्याने दिसते. हिच्या बिया अधिक उष्ण तापमानाच्या प्रदेशात मुळांच्या संपर्कात आल्या की, जमिनीखाली वाढतात. चार-पाच आठवड्यांमध्ये तिची निळसर जांभळी दांडी आणि फिकट जांभळी फुलं दिसू लागतात. ही वनस्पती ‘हेमी परासाईट’ वर्गात येत असल्याने हिचा जीवनक्रम
 
 
 
शेवळा
या झाडाचे शास्त्रीय नाव - सुरण वर्गातील आणि अ‍ॅरॅसी कुळातील आहे. शास्त्रीय नाव Amorphophallus Commutatus असे आहे. बहुतांश ठिकाणी याला शेवळा असे म्हणतात. शेवळा म्हणजे खरं तर रान सुरणाच्या फुलांची दांडी. जमिनीत असलेल्या कंदाला पावसाळा सुरू झाला की, उंच दांडी असलेला फुलोरा बाहेर येतो. हा फुलोरा आतून गुलाबी आणि बाहेरून तपकिरी जांभळट रंगाच्या बोटीच्या आकाराच्या टोपणात झाकलेला असतो. फुलोरा अतिशय नाजुक सोनेरी पिवळसर रंगाच्या आणि तळाकडे जांभळट होत गेलेला असतो. या फुलोर्‍याच्या तळाशी मादीफुले तर वरच्या बाजूला नर फुले असतात. भाजीसाठी संपूर्ण फुलोर्‍याची दांडीच वापरतात. यामध्ये प्रोटिन्सचे प्रमाण खूप असते. मात्र, ताज्या दांड्याची भाजी लवकर बनवणे आवश्यक आहे. पाऊस व्यवस्थित सुरू झाला की, ही फुलं गायब होऊन हिरवी पाने येऊ लागतात. त्यामुळे ही भाजी तशी अगदी दहा 15 दिवसांसाठी मिळू शकते. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असलेल्या या भाजीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे सुईसारखे ‘क्रिस्टल’ असल्याने त्यापासून खाज उठू शकते. हे टाळण्यासाठी शेवळे गरम पाण्यात चांगले ताफवून घ्यायची असतात. त्यात चिंच अथवा इतर आंबट पदार्थ घालून भाजी बनवली जाते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@