जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनाचा निर्णय ‘ड्रोन’च्या वापरास बंदी

05 Jul 2021 11:44:02

drone_1  H x W:
श्रीनगर : हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने राज्यात ‘ड्रोन’च्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.प्रशासनाने ‘ड्रोन’च्या खरेदीवरही पूर्णपणे बंदी घातली असून ज्यांच्याकडेही ‘ड्रोन’ आहेत. त्यांनी लवकरात लवकर ते पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे ‘ड्रोन’ ठेवणे, विक्री आणि त्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

यासह कृषी, पर्यावरण आणि आपत्ती निवारण क्षेत्रात आणि देखरेखीसारख्या बाबींसाठी ‘ड्रोन’चा उपयोग करणार्‍या सर्व सरकारी विभागांना ‘ड्रोन’चा उपयोग करण्यापूर्वी पोलिसांना माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे. आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.जम्मूत हवाईदलाच्या तळावर गेल्या रविवारी स्फोटके असलेल्या ‘ड्रोन’द्वारे हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर अनेकदा सीमावर्ती भागात काही ‘ड्रोन’च्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने आता जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनच्या वापरावर सध्या बंदी आणली आहे.


 
 




 
Powered By Sangraha 9.0