आयपीएलमध्ये होणार 'मेगा ऑक्शन' ; येणार २ नवे संघ

05 Jul 2021 21:37:16

IPL 2022_1  H x
 
 
मुंबई : आयपीएल क्रिकेट प्रेमींसाठी बीसीसीआयने पुन्हा एकदा एक धमाकेदार माहिती दिली आहे. आयपीएल २०२२मध्ये बीसीसीआय २ नव्या संघाचा समावेश करण्याच्या विचारात आहे. ऑगस्टपर्यंत या संघाच्या निविदा बीसीसीआय मागवू शकते. दरम्यान, आतापर्यंत आठ संघ आयपीएलमध्ये खेळत होते. नविन दोन संघाचा समावेश वाढल्याने सामने वाढणार आहेत. तसेच, या हंगामासाठी बीसीसीआय मेगा लिलाव करणार आहे.
 
 
 
मिडीया रिपोर्ट्समध्ये आलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआय ऑगस्टमध्ये दोन नवीन संघांसाठी निविदा काढू शकते. हे संघ खरेदी करण्यासाठी गोएंका ग्रुप आणि अदानी ग्रुप शर्यतीत आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ फ्रेंचायझी यात पुढे आहेत. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्याही १५ ते ३० सामन्यांनी वाढणार आहे."
 
 
तसेच, बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा लिलाव करू शकतो. सर्व संघ ४ खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे, असे देखील सांगण्यात येत आहे. एका आयपीएल संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू ठेवता येतात. आता दोन संघांचा समावेश होत असल्यामुळे नविन ५० खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. दरम्यान, आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. ६० पैकी २९ सामने झाले आहेत. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0