भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामीचा मृत्यू

05 Jul 2021 17:14:42

stan _1  H x W:



मुंबई : एल्गार परिषद आणि नक्षलवादी चळवळींशी संबंधित आरोपी फादर स्टॅन स्वामीचा मृत्यू झाला आहे. सोमवार, ५ जुलै २०२१ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. सोमवारी स्टॅन स्वामीच्या जामीनावर सुनावणी सुरू होती.
यावेळी स्टॅन स्वामीच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, "रविवारी रात्री उशिरा ८४ वर्षीय स्टॅन स्वामीची प्रकृती बिघडली. सकाळी ४.३० वाजता त्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. ८४ वर्षीय स्टॅन स्वामीला मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीवरून २८ मे रोजी होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले गेले होते. प्रकृती ढासळत चालल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0