नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण जप्त पिस्तुलाचा वापर नाहीच?

03 Jul 2021 12:16:27

dabholkar_1  H


 नवी दिल्ली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा वापर हत्येत झालाच नसल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी’ने (सीएफएसएल) तसा अहवाल दिला.



अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ रोजी पुणे येथे गोळी मारून हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’ने आपल्या हाती घेतला होता. १७ महिन्यांपूर्वी हत्येमध्ये वापरण्यात आलेले पिस्तुल समुद्रातून शोधून काढल्याचा दावा ‘सीबीआय’तर्फे करण्यात आला होता. त्यासाठी ‘सीबीआय’ने नॉर्वे येथून विशेष प्रशिक्षित पाणबुडे बोलाविले होते. त्याचप्रमाणे दुबई येथूनही काही यंत्र मागविण्यात आले होते. पिस्तुल सापडल्यानंतर प्रकरणाचा गुंता सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 

‘सीबीआय’ने सदर पिस्तुल पुढील तपासणीसाठी ‘सीएफएसएल’कडे पाठविले होते. पिस्तुलाची तपासणी झाल्यानंतर ‘सीएसएफएल’ने दिलेल्या अहवालात धक्कादायक बाब पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहवालानुसार, पुणे येथे घटनास्थळी सापडलेली पिस्तुलाची गोळी ही ‘सीबीआय’ला सापडलेल्या पिस्तुलाचा वापर करून झाडण्यात आलेली नाही. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणात पुन्हा एकदा गुंता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

 



Powered By Sangraha 9.0