विद्यार्थ्यांच्यासाठी २००० रुपयांचे मोफत टॉप स्कोरर..

03 Jul 2021 14:20:49

aashish shelar_1 &nb


मुंबई : प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात दहावीचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण यावरूनच पुढील आयुष्याची वाट निश्चित केली जाते.सध्याची संकटजन्य परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षणातून शाळांना खूप कमी वेळ मिळत असल्याने मुलांना अनेक गोष्टी सविस्तरपणे उलगडून सांगितल्या जात नाहीत. शिवाय या आर्थिक संकटाच्या काळात प्रत्यक्ष क्लासेस परवडणारे तर नाहीतच, पण कोविडच्या भीतीने मुलांच्या जीवावर बेतणारे ठरू शकते.

हीच निकड ओळखून  भारतीय जनता पार्टी माहिम विधानसभा आशिष शेलार साहेब ,माजी शिक्षणमंत्री, आमदार व पक्ष प्रतोद यांच्या मार्गदर्शनाखाली. जितेंद्र भाई राऊत यांच्या सौजन्याने भारतीय जनता पक्षाच्या माहिम विधानसभा शिक्षक आघाडीच्या माध्यमातून काही होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना अभ्यास समजण्यासाठी सोपा व्हावा म्हणून व्हिडीओ च्या माध्यमातून सुटसुटीत माहिती देणारे २०००/- रुपये किंमतीचे नवनीत इनिशिएटिव्हचे टॉप स्कोअरर ऍप मोफत दिले जाणार आहे.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आशिष शेलार यांची असणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमात अक्षता तेंडुलकरसह रवी रांगणेकर ,सानी साठे,विकास मंडलिक,डेव्हिड अल्फान्सो,संतोष गुरव, मनोज शाह,महेंद्र खेडेकर इत्यादी उपस्थित असतील. दिनांक : शनिवार ०३/०७/२०२१, सायंकाळी ४.३० वा. पिपल्स एज्युकेशन सोसायटी, (महाराष्ट्र हाय स्कूल),चंद्रकांत धुरू वाडी, दादर, मुंबई- २८ येथे हा कार्यक्रम होईल.










Powered By Sangraha 9.0