कोरोनामुळे आई-वडीलांचा मृत्यू झालेल्या मुलांचा खर्च योगी सरकार उचलणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021
Total Views |
corona_1  H x W



लखनऊ -
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री बाल सेवा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत कोरोना साथीच्या आजारामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना सरकारतर्फे मदत करण्यात येईल. ही योजना कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या संगोपनापासून त्यांचे शिक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेंतर्गत अनाथ मुलींचे लग्नाचे वय झाल्यावर त्यांना १ लाख १ हजार रुपये देण्याचीही घोषणा केली आहे.
 
 
 
 
कोरोनामुळे आई-वडील मृत्यू पावल्याने अनाथ झालेल्या मुलांच्या संगोपनासाठी योगी सरकारने बुधवारी (28,2021 जुलै) एक योजना जाहीर केली. या योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यूपी सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानेही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहित नमुना जिल्ह्यांना पाठवला आहे. याअंतर्गत लाभार्थी मुलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी १५ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
प्रधान सचिव व्ही. हेकाली झिमोमी यांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले होते की, “उत्तर प्रदेश मुखमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत ज्या मुलींना लाभ मिळत आहे, त्यांनाच त्यांच्या लग्नासाठी अर्थसहाय्य दिले जाईल आणि पैसे देण्यात येतील. वराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि लग्नाच्या तारखेनुसार वधूचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. या योजनेअंतर्गत लग्न तारखेच्या ९० दिवस आधी किंवा लग्नानंतर ९० दिवस नंतर अर्ज करावा लागेल. अर्जासह सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये; मुलगी आणि तिच्या मार्गदर्शकांचे अलीकडचे छायाचित्र, पालकांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, कोविडमुळे झालेल्य मृत्यूचा पुरावा, वधू-वरांचे वयाचे प्रमाणपत्र, लग्नाचे कार्ड आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक असेल.
 
 
उल्लेखनीय बाब म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना कोरोना कालावधीत अनाथ मुलांसाठी योगी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत मुलीच्या विवाहासाठी मदत करण्याबरोबरच प्रत्येक मुलाला दरमहा ४ हजार रुपये मिळतील. तसेच ११ वर्षापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना १२ वी पर्यंतचे शिक्षण विनामूल्य मिळेल.
@@AUTHORINFO_V1@@