आमदार संजय केळकर आणि उद्योजक चेतन रायकर यांची 'पार्क'ला सदिच्छा भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021
Total Views |

PARC _1  H x W:


मुंबई : ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि नवी मुंबईतील स्ट्रक्ट्वेल कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चेतन रायकर यांनी गुरुवार, दि. २९ जुलै रोजी मुंबई येथील 'पॉलिसी अॅडवोकॅसी रिसर्च सेंटर'च्या (पार्क) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी पार्कचे संस्थापक संचालक दिलीप करंबेळकर यांनी पार्कच्या कार्याची व्याप्ती मांडली.
'पार्क'च्या 'नेटवक डेव्हलपमेंट व स्ट्राटेजिक अलायान्सिस' प्रमुख व समन्वयक रुचिता राणे यांनी जम्मू काश्मीर येथे चालणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. तसेच संगीतविषयक प्रकल्पाची व शासकीय धोरणाविषयक संशोधनात्मक कार्याची सविस्तर माहिती दिली.


'पार्क'च्या 'रिसर्च स्कॉलर' मुग्धा वहाळकर यांनी त्रिपुरा संदर्भात सुरू असलेल्या प्रकल्पाविषयी तर नितीन फुगे यांनी कृषी विषयक सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे माहिती दिली. कौस्तुभ काळोखे यांनी आर्थिक विषयासंदर्भात सुरू असलेल्या कामाविषयी माहिती दिली. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@