टोकियो ऑलिंपिक २०२१ : गतविजेत्या अर्जेंटिनाला नमवत भारत उपांत्यपूर्व फेरीत

29 Jul 2021 15:56:09

Indian Hockey_1 &nbs
 
 
 
टोकियो : गेल्या काही दिवसांपासून टोकियो होणार्‍या ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी ही सुमार होत होती. यानंतर सातव्या दिवशी भारताने गतविजेत्या अर्जेंटिनावर ३ - १ अशी मात करत दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात अखेरच्या २ मिंनिटांमध्ये वरुण कुमारने शानदार गोल करत भारताला विजय मिळवून दिला. यामुळे त्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे. भारताने आता उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
 
 
 
वरुण कुमारने ऑलिम्पिक करियरमध्ये पहिला गोल करत आपली प्रतिभा दाखवून दिली. भारताकडून वरुण, विवेक सागर, हरमनप्रीत यांनी प्रत्येकी एक -एक गोल केले. २६ वर्षीय वरुणचा हा ऑलिम्पिकमधील पाहिलाच सामना होता. या विजयासह भारतीय संघ ग्रुप ए मध्ये तीन विजयासह ९ गुण मिळवत दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया सर्वच्या सर्व ४ सामने जिंकून १२ गुणासह अव्वल स्थानावर आहे. तर स्पेन न्यूझीलंड आणि अर्जेंटिनाच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. पण, गोल सरासरीच्या जोरावर स्पेन तिसऱ्या, न्यूझीलंडने चौथ्या आणि अर्जेंटिना पाचव्या स्थानावर आहे. यजमान जपान एक गुणासह सर्वात शेवटी आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0