ऑलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ लवकरच संपणार ?

28 Jul 2021 18:23:20

Olympic_1  H x
मुंबई : टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२१मध्ये काही भारतीय खेळाडूंना अपयशाला सामोरे जावे लागत आहेत. आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताला फक्त एकच रौप्य पदक मिळालेले आहे. ऑलिम्पिकला प्रारंभ होऊन ६ दिवस झाले असून आता पुन्हा एकदा भारतीयांची पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि बॉक्सिंगमध्ये पूजा राणी उपांत्यपूर्ण फेरीत पोहोचली आहे. तर बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू नॉकआउट फेरीत पोहोचली आहे.
 
 
भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने उपांत्य फेरीत मजल मारल्यानंतर आता आणखी २ खेळाडूंमुळे भारताचा पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तिरंदाजीत दीपिका कुमारीने महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. तसेच, महिला बॉक्सिंगमध्ये पूजा राणी ७५ किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड १६ मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा ५-०ने पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे आता या दोघीही पदकापासून एक पाऊल दूर आहेत.
 
 
वेटलिफ्टर मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले. दरम्यान, भारताचा स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने हाँगकाँगच्या चियुंग नगन यी हिचा पराभव करत नॉकआउट फेरी गाठली. परंतु, पुरुष गटात बी साई प्रणीतचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय महिला हॉकीच्या संघाकडूनही निराशाच हाती लागली असून ग्रेट ब्रिटनविरुद्ध सामना गमावल्यानंतर हा त्यांचा तिसरा पराभव ठरला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0