आसाम, मिझोराम सीमावाद आणि चकमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2021
Total Views |

Assam_1  H x W:
 
 
दोन दिवसांपूर्वी आसामच्या दक्षिण सीमेवरील कछर जिल्ह्यात मिझोराम आणि आसामच्या पोलीस दलांमध्ये चकमक झाली. बंदुकीच्या फेरी झाडल्या गेल्या. त्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला. दोन राज्यांच्या पोलीस दलांनी एकमेकांशी शत्रुराष्ट्र असल्याप्रमाणे युद्ध करणे, अशी लाजिरवाणी घटना भारताच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. त्यामुळे या प्रकाराची साद्यंत माहिती आपल्याला असणे क्रमप्राप्तच आहे.
 
 
आसामच्या सीमा ईशान्य भारतातील अरूणाचल, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर या राज्यांशी आणि बांगलादेश, नेपाळ या देशांशी सामायिक आहेत, हे आपण जाणतोच. ईशान्य भारतातील अडचणी, इथले तंटे समजून घ्यायचे, तर या भूभागाचा, इथल्या जनजातींचा इतिहास समजून घेणे, इथल्या भूगोलाचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे.
 
 
इथे गेली हजारो वर्षे वसणार्‍या विविध जनजाती, त्यांच्या परंपरा, आचरणपद्धती, त्यांच्यातील एकमेकांत झालेले तंटे, करार, विविध गटांच्या महत्त्वाकांक्षा, इथले राजकारण, सामाजिक तानाबाना, इत्यादी शेकडो गोष्टींचे ‘ग्रीड’ समजून घ्यायला सुरुवात केली की, प्रश्नांचे खरे स्वरूप आपल्याला जाणवू लागते.
 
 
 
दोन दिवसांपूर्वी आसामच्या दक्षिण सीमेवरील कछर जिल्ह्यात मिझोराम आणि आसामच्या पोलीस दलांमध्ये चकमक झाली. बंदुकीच्या फेरी झाडल्या गेल्या. त्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला. दोन राज्यांच्या पोलीस दलांनी एकमेकांशी शत्रुराष्ट्र असल्याप्रमाणे युद्ध करणे, अशी लाजिरवाणी घटना भारताच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. त्यामुळे या प्रकाराची साद्यंत माहिती आपल्याला असणे क्रमप्राप्तच आहे. ‘मिझो’ गटांनी आसामविरूद्ध दाखवलेली आक्रमकता समजून घ्यायची असल्यास, मिझोराममधील ड्रग्ज, सुपारी आणि इतर कार्टेल्सच्या बेकायदेशीर माफियाबद्दल आपण समजून घेणे गरजेचे आहे.
 
 
आसाम आणि मिझोराम पोलिसांत जी चकमक झाली, त्यात अनेक राष्ट्रदोही संघटनांचा सहभाग असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही घटना केवळ वरवर दिसणारा दिखावा आहे. यात जमीन माफिया, जंगल माफिया, अमली पदार्थ तस्कर, धार्मिक उन्माद घडवण्याचा प्रयत्न करणारे घटक अशा अनेक समाजविघातक घटकांचा समावेश असल्याचे लक्षात येत आहे.
 
 
आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि ‘नेडा’चे (नॉर्थईस्ट डेमोक्रॅटिक अलायंन्स) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांनी ड्रग्जमाफिया, तस्करी रॅकेट्स इत्यादीविरोधात शपथग्रहणानंतर लगेचच मोठी मोहीम उभारली. आपण अनेक वेळा अनेक प्रकारे हे ऐकले, वाचलेले आहे की, मिझोराममार्गे म्यानमारमधील अमलीपदार्थ भारतात येतात. आता भारतात आले तरी भारतातील विविध शहरांत पोहोचण्यासाठी त्यांना आसाममार्गे प्रवास करावाच लागतो. या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक साखळीला आता हिमंतांच्या या कडक कारवाईमुळे मोठाच फटका बसू लागला आहे. आसाम पोलीस या कामात मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत 163 कोटींचे अमली पदार्थ जाळून नष्ट केले गेले. अर्थात, या कारवाईने केवळ सात-दहा टक्के मालच पोलिसांच्या हाती लागला होता. पण, तरीही यामुळे या तस्कर गुंडांसाठी आसाम पोलीस हे त्यांचे नंबर एकचे शत्रू झाले आहेत. मिझोराम पोलिसांच्या आडून या गुंड टोळ्यांची ही चकमक घडवून आणत होत्या, असे आता लक्षात येते आहे. त्यामुळे ही चकमक दोन राज्यांच्या पोलिसांतील नसून समाजघाती गुंड, तस्कर टोळ्या आणि पोलीस अशी आहे, असेच एका अर्थाने म्हणावे लागेल.
 
 
तसेच आसामचे अरुणाचल, नागालँड, मिझोराम इत्यादी राज्यांबरोबर सीमावाद आहेत. उदाहरणार्थ, नागालँडमधील दिमापूर या अतिशय गजबजलेल्या, त्यामानाने श्रीमंत शहराचे नाव, ‘दिमासा’ या आसामी जनजातीच्या नावावरून ठेवले असे इतिहास सांगतो. त्यामुळे नागालँड निर्मितीपासून दिमासा लोकांना या गोष्टीचे वैषम्य वाटत आले आहे. अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टी सांगता येतील. ही चकमक जिथे झाली ते एक ‘रियांग’ जनजातीचे गाव आहे. ‘रियांग’ लोक मिझोराम, त्रिपुरा, आसाम, म्यानमार इत्यादी ठिकाणी रहातात. ‘रियांग’ आणि ‘मिझो’ जनजातींचा एकमेकांतील तणाव फार जुना आहे. त्यापायी ५०-६० हजार ‘रियांग’ना मिझोराम सोडून त्रिपुरात ‘रेफ्युजी’ म्हणून जीवन जगावे लागले, हे आपल्याला ज्ञात असेलच.
 
 
 
मिझोराम-आसाम सीमेवर जे जंगल होते, ते जंगल माफियांनी, तस्करांनी गेल्या काही दशकांत तोडून साफ केले आहे. दहा ते वीस फुटांचे घेर असणारे शेकडो वृक्ष गेल्या शतकात नेस्तनाबूत झालेले आहेत. त्यामुळे आता इथे सरळ धरातल निर्माण झाला आहे. त्या जमिनीवर हक्क सांगेल तो विविध ठिकाणांहून येणार्‍या-जाणार्‍या महामार्गांवर नियंत्रण ठेवू शकेल. त्यामुळे कछर जिल्ह्यातील हा भूभाग आपल्या ताब्यात यावा, यासाठी काही ‘मिझो’ गट फार प्रयत्नशील आहेत. आसाममधील जंगलांवर कब्जा मिळाल्यास तेथील लाकूडचोरीचा हजारो कोटींचा धंदा उपलब्ध होणार आहे.
 
 
तसेच सुपारी, खते, सिगारेट्स यांची तस्करी करणार्‍या गटांनाही हिमंता सरमा मुख्यमंत्री झाल्यापासून मोठी हानी पोहोचू लागली आहे. तेही अशी काहीतरी योजना करण्याच्या प्रयत्नात आहेत.
 
 
यात ‘यंग मिझो असोसिएशन’, ‘मिझो स्टुडंट युनियन-मिझो झिरलई पॉल’ इत्यादी मिझोराम सरकारला आपल्या तालावर नाचवणारे गट पुढाकार घेऊन आहेत. मिझोराममध्ये या डाव्या, चर्चप्रणित गटांचा प्रचंड दबाव आहे. त्यांचे समांतर किंवा ‘अंडरग्राऊंड’ सरकारच इथे चालते असे म्हटले तरी त्यात वावगे ठरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पोलीसबळाचा वापर आपल्या सोयीनुसार करणे त्यांना सहज शक्य आहे. राज्य सरकारही या गटांसमोर नमते घेत त्यांना पाठीशी घालण्याचे काम करते, हेच या घटनेवरून दिसून येत आहे.
 
 
बरं! सोमवारी घडलेली ही घटना ‘मिझों’च्या आसामी भूभागावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याची एकमेव घटना नाही. अशा घटना बराक खोर्‍यात अनेकदा घडलेल्या आहेत. हिमंता सरमांना ’अकार्यक्षम मुख्यमंत्री’ म्हणून बदनाम करण्याच्या प्रयत्नांतील ही एक खेळी आहे. परंतु, मुख्यमंत्री सरमांनी अत्यंत संयत भूमिका घेत मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांशी शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सतत संपर्क ठेवलेला आहे.
 
 
एकंदरीत नाक दाबल्याने होणारा मिझोराममधील समाजविघातक लोकांचा त्रागा आणि झळफळाट या चकमकीद्वारे जगापुढे आला आहे.
 
 
- अमिता आपटे
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@