दानिश सिद्धीकी त्याच्या कर्मानं गेला : तालिबान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2021
Total Views |

Danish _1  H x

काबूल : अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर कब्जा केल्यानंतर तालीबानने आता भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये दखल देणार नसल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गुंतवणूकीचीही रक्षा करेल, राष्ट्रीय निर्माण कार्यात जे सुरू आहे त्यात दखल दिली जाणार नाही. ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या एका मुलाखतीत तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने छायाचित्रकार दानिश सिद्दीकीच्या मृत्यूबद्दलही वक्तव्य केले आहे.
 
 
दानिश सिद्दीकी युद्धात मारले गेले, त्यांच्या मृत्यू कुठल्या गोळीमुळे झाली याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानने दानिशच्या मृतदेहाची विटंबना झाल्याबद्दलही कुठलेही वक्तव्य केले नाही. भारतीयाची हत्या झाल्यानंतर त्याचे शीर वाहनाने उडवण्यात आले होते. दानिश सिद्दीकीच्या मृत्यूला तो स्वतःच जबाबदार असल्याचेही तालिबानने म्हटले आहे, दानिश शत्रूच्या टँकवर होता, असेही तालिबानने म्हटले आहे.
 
 
युद्धभूमीवर येण्यापूर्वी दानिशने तालिबानची परवानगी मागितलेली नव्हती. जबीउल्लाह मुजाहिदने म्हटले की, आम्ही त्याचा तेव्हाचा फोटो दाखवून सिद्ध करू शकतो की, त्याच्या मृतदेह जाळला गेला नाही. त्याचा मृतदेह युद्धभूमीवर पडून होता. ओळख पटवल्यानंतर रेडक्रॉसच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मृत्यूबद्दल तालीबाननं माफी मागण्यासही नकार दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@