मृतदेह शोधण्याचे काम सुरू अन् मंत्री दौऱ्यावर करतात मटणाच्या पार्ट्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2021
Total Views |

Mahad _1  H x W



माजी आमदाराचा गंभीर आरोप


खेड : कोकण दौऱ्यावर असताना राज्याचे मदत व पूर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मटणाचे फोटो व्हायरल झाल्याचा आरोप माजी आमदाराने केला आहे. आम्ही संकटात आहोत, दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा कण गेलेला नाही आणि नुकसानग्रस्त दौऱ्याच्या नावाखाली विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या समर्थकांनी मटणाच्या पार्ट्यांवर ताव मारल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. कदम यांनी एका व्हीडिओद्वारे हा गंभीर प्रकार सर्वांशी शेअर केला आहे.


कदम म्हणाले, "संपूर्ण रत्नागिरीकर उपाशी असताना, मृतदेहांचा खच पडून असताना, गावांचा संपर्क तुटला असताना तिथे जाऊन पाहणी करण्यासाठी वेळ नाही. खेडमध्ये ज्या भागात दुर्घटना झाल्या तिथे जाण्यासाठी वेळ नाही आणि नेत्यांच्या मित्रांसोबत पार्ट्या सुरू आहेत. या प्रकाराचे फोटो व्हायरल झाल्याने संपूर्ण कोकणवासीयांना याबद्दलची चीड आहे. आम्ही मदत व पूर्नवसन मंत्री यांचा जाहीर निषेध करतो."


@@AUTHORINFO_V1@@