देशात एकूण ४ लाख ८ हजार ९७७ सक्रीय कोरोना रुग्ण

25 Jul 2021 16:02:48

corona _1  H x



रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३५ टक्के

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एकूण ३,०५,०३,१६६ कोरोना रुग्ण बरे झाले असून, गेल्या २४ तासांत ३५,०८७ जण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९७.३५ टक्के एवढा आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३९,०९७ नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण सक्रिय रुग्णसंख्या ४,०८,९७७ इतकी असून, सक्रिय रुग्ण एकूण रुग्णसंख्येच्या १.३१ टक्के आहेत.
 
साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा कमी कायम असून, सध्या २.२२ टक्के आहे. दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर २.४० टक्के, सलग ३३व्या दिवशी तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.आतापर्यंत एकूण ४५.४५ कोटी चाचण्या झाल्या. आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ४४,५३,८६,३९० लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच, आणखी ८५,५८,३६० लाख मात्रा लवकरच दिल्या जाणार आहेत. यापैकी, एकूण ४१,५५,५०,५४३ मात्रांचा वापर करण्यात आला आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह खासगी रुग्णालयांकडे अद्याप २.९८ कोटींपेक्षा जास्त (२,९८,३५,८४७) लसींच्या मात्रा शिल्लक आहेत.
Powered By Sangraha 9.0