महिलेने फोडला सीएमसमोर टाहो! भास्कर जाधवांनी उचलला हात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2021
Total Views |

News _1  H x W:





भास्कर जाधव तुम्हाला सत्तेची एव्हढी गुर्मी चढली आहे का?

चिपळूण : कोकणातील भीषण पूरस्थितीनंतर आता खायचं काय, अंगावर नेसायचं काय आणि रहायचं कुठे, असा प्रश्न पूरग्रस्तांना पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. "आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा", असा टाहोच एका महिलेने फोडला. मात्र, गुहागर विधानसभा मतदार संघातील आमदार भास्कर जाधव यांचा कोकण दौऱ्यातील उद्दामपणा व्हायरल व्हीडिओतून दिसून येत आहे. खासदारांनी-आमदारांनी पाच महिन्यांचा पगार दिला तरीही हे संकट दूर होणार नाही, ए बाळा तुझ्या आईला समजवं, चला!, अशा भाषेत भास्कर जाधव पूरग्रस्तांशी हुज्जत घालताना दिसून येत आहेत.
 
 
भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात एका पूरग्रस्त महिलेवर हात उगारतानाही दिसून येत आहेत. या प्रकारावरून राज्यभरातून संताप व्यक्त केले जात आहे. भाजपनेही या प्रकरणी टीका केली आहे. "तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. मात्र, भास्कर जाधवांची नागरिकांवरच्या दमदाटीमुळे सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी १ वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांना आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. नेमका याच वेळी हा वाद झाला.
 
सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होतोय हे आमदार जाधव यांच्या लक्षात आले नाही. भास्कर जाधवांचे अशाप्रकारचे दोन व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. भास्कर जाधव हे पूरातील प्रत्येक पीडितांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी असेच धमकावत होते का, मुख्यमंत्र्यांपासून सत्य परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे का, कोकणाला जास्तीत जास्त मदत पोहोचू नये, अशी भास्कर जाधवांची इच्छा आहे का, मग पूरग्रस्तांची आसवे पुसण्याऐवजी त्यांना दमदाटी का केली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
 
 
मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. तरीही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याने तिथून काढता पाय घेतला. हो मदत करतो यापेक्षा जास्त मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. सोबत इतके मंत्री, कार्यकर्ते आणि लवाजमा असताना एकाही व्यक्तीला तिथल्या महिलेची विचारपूस करावीशी वाटली का नाही, असाही प्रश्न आता विचारला जात आहे.


महाराष्ट्रात माता भगिनींनी आरती करत त्यांचा सन्मान केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये आज त्या माता भगिनींवर हात उचलण्याचे पाप आज हे शिवसेनेचे लोक करत आहेत चिपळूण मध्ये मराठा सैन्याची छावणी पडली असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांस एक पत्र लिहले होते. महाराज लिहतात, रयतेच्या भाजीच्या देठासही अन्यायाने हात लावू नये. गोर गरीबांची गवत काडी सुरक्षित राहिली पाहिजे. एवढंच नाही तर बेशिस्त कराल तर बदनामी येईल लोकांना वाटेल की आपण मोगलाई मुलुखात आलो आहोत. हे महाराजांचे शब्द ज्या चिपळूण मध्ये अमर झाले आज माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समोर त्या पवित्र पत्राला पायदळी तुडविण्याचे काम हे भास्कर जाधवांनी केले. ज्या महाराष्ट्रात माता भगिनींनी आरती करत त्यांचा सन्मान केला जातो त्या महाराष्ट्रामध्ये आज त्या माता भगिनींवर हात उचलण्याचे पाप आज हे शिवसेनेचे लोक करत आहेत आणि तेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समोर. उधहवजी हे रयतेचं राज्य नाही. आपण महाराष्ट्रात मोगलाई स्थापन केली आहे.

संजय पाण्डेय अध्यक्ष भाजपा उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश
@@AUTHORINFO_V1@@