यंदाही कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका !

24 Jul 2021 19:46:48

keshav upadhey_1 &nb


भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांना टोला



मुंबई:
अतिवृष्टी, पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी २४ जुलै रोजी महाडमधील तळिये येथील दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली.'तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळं तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावकऱ्यांना दिले. मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका,असा टोला भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

उपाध्ये यांनी ट्विट केले आहे की, मुख्यमंत्र्यांनी दोन तासाचा का होईना दौरा काढला हे चांगलं केलं, पण मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका. यावेळी मनापासून मदत करा, आणि खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल याचीही काळजी घ्या. या संकटात विरोधीपक्ष म्हणून सोबत आहोत, तोक्ते वादळाने पुरते उद्ध्वस्त करून टाकले, आणि त्यातून जे काही बचावले, ते महापुराने धुवून नेले. अतिवृष्टीमुळे मालमत्ता, घरेदारे, होत्याची नव्हती झाली. निसर्ग वादळाच्यावेळी मदत मिळालीच नाही हे तोक्ते वादळाच्या वेळी लक्षात आले होते. तोक्तेच्या वेळची मदत अद्याप मिळालेली नाही.आता महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जनतेला आधार देऊया. आम्ही विरोधी पक्ष, तुमच्या सोबत आहोत, असेही उपाध्ये म्हणाले.


दरम्यान कोकणवासीयांवर गेल्या २ यावर्षात ३ नसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला. गेल्यावर्षी आलेलं निसर्ग चक्रीवादळ, यंदाच्या वर्षी आलेले तौक्ते चक्रीवादळ आणि आता महापुराची संकट आले आहे. मागील दोन्ही वेळेस केवळ घोषणा आणि आश्वासने सरकारने दिली. कोणतीही आर्थिक मदत कोकणवासियांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. त्यामुळेच उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Powered By Sangraha 9.0