हिंदू पंचाग दिनदर्शिकेत वर्तवलेले पुराचे भाकित ठरले खरे ? फोटो व्हायरल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |
HINDU_1  H x W:



मुंबई - सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हा पूर परिस्थितीमधून सावरत आहे. मात्र, या पुरांचे भाकित एका हिंदू पंचाग दिनदर्शिकेत वर्तवण्यात आले होते. त्यामध्ये २२ ते २७ जुलै रोजी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल आणि काही ठिकाणी पूर येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. या दिनदर्शिकेचे फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
 
 
 
कोकणातील चिपळूण तालुक्याला पुराचा फटका बसला आहे. तिथली परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. महाड, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरड कोसळून काही लोकांचे प्राण गेले आहेत. आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा कहर सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात येणाऱ्या या पुराचे भाकित एका हिंदू पंचाग दिनदर्शिकेने वर्तवले होते. श्री.महालक्ष्मी या दिनदर्शिकेतील जुलै महिन्याच्या वृत्तांमध्ये महाराष्ट्रामध्ये पूर येईल, असे भाकित वर्तवण्यात आले आहे.
 
 
 
श्री.महालक्ष्मी दिनदर्शिकेच्या जुलै महिन्यातील वृत्तांतामध्ये म्हटले आहे की, "सोमवार दि. १९ जुलै रोजी उत्तर रात्री ४ वाजून ४३ मिनिटांनी सूर्य पुष्प नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन घोडा आहे. प्रवेश वेळी मिथुन लग्न आहे. बहुतांश महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होईल. काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. दि.२२ ते २७ जुलै आणि दि.३० जुलै ते दि. १ आॅगस्ट रोजी पाऊस अपेक्षित आहे." दिनदर्शिकेच्या या वृत्तांताचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या वृत्तांतामध्ये मांडलेले भाकित खरे ठरल्याचे चर्चा आहे.
@@AUTHORINFO_V1@@