‘कोरोनामुक्ती’चा दर देशात ९७.३६ टक्क्यांवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |

corona_1  H x W

 नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी, ४ लाख, ६८ हजार, ७९ कोरोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांत ३८ हजार, ७४० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर ९७.३६ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार,३४२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख, ५ हजार, ५१३ एवढी आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या १.३० टक्के आहे.
  

साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असून सध्या हा दर २.१४ टक्के आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर २.१२ टक्के असून सलग ३२व्या दिवशी हा दर तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली असून आतापर्यंत एकूण ४५.२९ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या ४२.३४ कोटी मात्रा देण्यात आल्या. केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्रोताद्वारे ४३.८७ कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत आणि याशिवाय आणखी ७१ लाख, ४० हजार मात्रा पुढील काही दिवसांत पुरवण्यात येणार आहेत. वाया गेलेल्या मात्रांसह एकूण ४१ कोटी, १२ लाख, ३० हजार, ३५३ मात्रा देण्यात आल्या आहेत. याशिवाय लसीच्या २.७५ कोटी पेक्षा जास्त मात्रा शिल्लक असून न वापरलेल्या अशा मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
@@AUTHORINFO_V1@@