पुरामुळे चीनला २० अब्जांचे नुकसान

    24-Jul-2021
Total Views |

flood_1  H x W:
 
बीजिंग : चीनमध्ये अनपेक्षित अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन मधील प्रमुख शहरांना या पुराचा फटका बसला आहे. यात आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.समोर येणारे फोटो हे भीतीदायक आहेत.गेल्या हजार वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा काही दिवसात झाल्यामुळे चीनची फार मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झालेली आपल्याला दिसून येत आहे. आतापर्यंत १० ते २० अब्ज रुपयांचे नुकसान झालेले वृत्तानुसार समजत आहे.


flood 8_1  H x

चीनमध्ये एवढी पूरसदृश परिस्थिती असताना तेथील राष्ट्रध्यक्ष मात्र विदेश दौरे करताना आपल्याला दिसून येत आहे. झिनपिंग यांनी नुकतीच तिबेटला भेट दिली आहे. यामुळे तेथीक अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.अनेक व्यक्तींचे घरदार उद्ध्वस्त झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. जगभरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण होत आहे. जर्मनीमध्ये सुद्धा पुरामुळे ३०० हुन अधिक लोकांचे जीव गेले आहेत,महाराष्ट्रात सुद्धा पुरामुळे हाहाकार माजले आहे. वैज्ञानिक याहून अधिक धोकादायक अतिवृष्टी आणि त्याद्वारे महापूर येण्याची शक्यता आहे.