दिव्यात बिबट्याची दहशत? सीसी टिव्हीत हालचाली कैद

24 Jul 2021 19:51:37

Thane_1  H x W:
 
ठाणे : दिव्यात बिबट्याचा वावर असल्याच्या वदंता पसरू लागल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. दिवा, आगासन गावातील राकेश मुंडे यांच्या घरी तीन मांजरीची पिल्ले अचानक गायब झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शोध घेतला असता, रात्री एकच्या सुमारास बिबट्यासदृष्य प्राणी घराच्या भोवती घिरट्या मारत असताना सीसी टिव्ही फुटेजमध्ये दिसुन आल्याने खळबळ उडाली आहे.
 
 
दिवा, आगासन गावात एका टोकाला राकेश मुंडे यांचे निवासस्थान आहे. २० जुलै रोजी त्यांच्या घरातील पाळीव मांजरीची तीन पिल्ले अचानक गायब झाल्याने मुंडे यांना संशय आला. त्यांनी घराच्या अंगणातील सीसी टिव्ही फुटेज तपासले असता २० जुलै रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास बिबट्यासदृष्य श्वापदाचा वावर आढळुन आला. पहाटे साडेतीन वाजेपर्यत या श्वापदाचा स्वैर संचार सीसी टीव्हीत कैद झाला आहे. मुंडे यांनी ही बाब वनविभागाला कळवली असता वनधिकाऱ्यानी हा प्राणी रानमांजर असावे. असा कयास वर्तविल्याचे सांगितले. मात्र, मांजराची तीन पिल्ले गायब झाल्यामुळे आगासन गावात भीतीचे वातावरण पसरले असुन हा प्राणी बिबट्या आहे की अन्य कोणता? याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0