तृणमूल काँग्रेसचे गोंधळी खासदार डॉ. सेन यांचे निलंबन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |

sen_1  H x W: 0

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे, माहिती आणि तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील कागद हिसकावून फाडणारे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य डॉ. शंतनू सेन यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

 
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत कथित हेरगिरीप्रकरणी केंद्र सरकारची अधिकृत भूमिका मांडली. मात्र, भूमिका मांडताना लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. राज्यसभेत स्पष्टीकरण देत असताना विरोधी पक्षांनी जोरदार गदारोळ केला. तृणमूल काँग्रेसचे सदस्य डॉ. शंतनू सेन यांनी यावेळी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरू केली. तरीदेखील वैष्णव यांनी स्पष्टीकरणे देणे सुरुच ठेवले होते. त्यानंतर सेन यांनी वैष्णव यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून फाडली आणि उपसभापतींच्या दिशेने भिरकावली. यावेळी भाजपचे सदस्य आणि सेन यांच्यामध्ये खडाजंगी झाली.

या प्रकाराविरोधात सत्ताधारी पक्षाकडून शुक्रवारी निलंबनाचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला. त्यानंतर सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सेन यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित केले. यावेळी नायडू यांनी सेन यांच्या कृत्याविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत गुरुवारी घडलेला प्रकार हा अतिशय अशोभनीय होता. सेन यांनी जे काही कृत्य केले. त्यामुळे सभागृहाची मर्यादा भंग झाल्याचे नायडू यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, शुक्रवारीदेखील संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दुपारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

 
@@AUTHORINFO_V1@@