हिरकणीवाडी येथे पुन्हा दरड कोसळली आहे

    24-Jul-2021
Total Views |

landslide_1  H

रायगड : रायगड येथे दरडी कोसळण्याची मालिका अजूनही सुरुच आहे.रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुन्हा आता अजून एक दरड कोसळली आहे.हे गाव डोंगराळ भागात वसलेले आहे. इथे अजूनही जोरात पाऊस सुरु आहे.दरड कोसळली असली तरी सध्या तरी कोणत्याही घरांचे नुकसान झालेले नाही आहे.मात्र या गोष्टीमुळे हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत.पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे.
 
 
हिरकणीवाडी हा डोंगराळ भाग आहे. महाड शहरापासून जवळपास २५ ते ३० किमी अंतरावर हिरकणीवाडी आहे. इथे जोरदार पाऊस असल्याने यंत्रणा वेळेत पोहोचणे कठीण आहे. सध्या हिरकणीवाडीत काही नुकसान झालं नसलं तरी सध्याचं वातावरण पाहता, खबरदारी घेणं आवश्यक आहे.रायगड जिल्ह्यातील तळीये गावातही दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. २२ जुलैला दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत ४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.दरडीखाली अजूनही नागरिक अडकल्याची भीती आहे. इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. त्यातच आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशीही हिरकणीवाडीत दरड कोसळल्याने अख्खा रायगड जिल्ह्यात दुर्घटनांच्या मालिकांनी हादरुन गेला आहे.