प्रशासन निष्काळजी ! सलग दुसऱ्या दिवशीही मदतकार्यास विलंब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jul-2021
Total Views |

taliye_1  H x W
महाडमधील तळिये येथे शनिवारीही मदतकार्य करण्यासाठी टीम उशिरा आल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला

अलिबाग : महाड तालुक्यातील तळिये याभागात दरड कोसळून अख्ख गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. गावावर गुरुवारी सायंकाळी दरड कोसळली. दुर्घटनेनंतर तब्बल २० तासांनी याठिकाणी प्रशासनाचे बचाव पथक पोहोचले. तोपर्यंत स्थानिकांनी बचावकार्य सुरु केले होते. सलग दुसऱ्या दिवशीही याभागात बचाव पथक उशिरा पोहोचल्याने स्थानिकांनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यावर संताप व्यक्त केला.

दुसऱ्या दिवशीही बचावपथक दुपारी १२ वाजता पोहोचल्यामुळे स्थानिकांनी प्रशासनाला जाब विचारला. '१ जेसीबी मदतकार्यासाठी आला तोही १२ वाजता आला. पाऊस नसतानाही प्रशासन उशिरा पोहोचत हे कोणतं प्रशासन आहे? असा सवाल संतप्त नागरिकांनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांना विचारला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदेही तिथे उपस्थित होते. स्थानिकांच्या सवालावर भरत गोगावले यांनी उत्तर देताना सांगितले, कोकण तालुक्यातील सर्व जीसीबी पाणी गेल्यामुळे बंद पडले आहेत. मात्र प्रशासन अत्यंत निष्काळजीपणाने वागत आहे. असेही स्थानिकांनी सांगितले.

तळीयेच्या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेतील ५० जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ३५महिला, १० मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसेच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगतिले. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखाची तर पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकार जखमीवर मोफत उपचार करणार आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.






@@AUTHORINFO_V1@@