रायगडमधील तळईत दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू; महाबळेश्वर खोऱ्यात दरड कोसळण्याचे सत्र

23 Jul 2021 13:44:57
raigadh _1  H x




रायगड -
रायगड जिल्ह्यातील तळई गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये साधारण ३२ जण दगावल्याची माहिती मिळाली आहे. या गावामध्ये एनडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि वैद्यकीय टीममार्फत बचावकार्य सुरू आहे.पावसाचा जोर वाढल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे.
 
 
महाबळेश्वर घाटामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे या पट्ट्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगडमधील दुर्गम भागातील तळई गावात दरड कोसळली आहेत. यामध्ये ३२ ते ३६ गावकऱ्यांचे मृतदेह सापडले आहेत. रायaगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. याठिकाणी २५ ते ३० घरांवर दरड कोसळल्याची माहिती त्यांनी दिली. या बचावकार्यासाठी एनडीआरएफचे १५ जणांचे पथक स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने काम करत आहेत. हा भाग डोंगरराळ आहे. शिवाय पाऊस कोसळण्यात सुरुवात झाल्याने मदतकार्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.
 
 
 
तळई बरोबरच पाटण तालुक्यातील कोंढवळे गावातही दरड कोसळली आहे. याशिवाय कोयना अभयारण्य परिसरातील मिरगाव आणि कामरगाव येथे भूस्खलन होऊन नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली आहे. कोयना - हेळवाक रस्त्यावर देखील भूस्खलन होऊन रस्ता बंद झाला आहे. कराड - चिपळूण महामार्ग देखील पाण्याखाली असून बंद आहे. त्यामुळे या दुर्गम भागातील गावांमध्ये मदतकार्य पोहचण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0