तळयेतील दुर्घटनमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड कोसळलेल्या गावाला मिळाली २० तासांनी मदत

23 Jul 2021 15:52:40
  foold_1  H x W:
 
 
रायगड - महाड तालुक्यातील तळये गावात दरड कोसळून ३९ जणांचे जीव गेले आहेत. गुरुवारी संध्याकाळी घडलेले या घटनेनंतर येथील गावकऱ्यांना शुक्रवारी दुपारी १ वाजता मदत मिळाली. त्यापूर्वीच तीन तासाआधीच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन पोहोचले. त्यामुळे या घटनेबद्दल प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष समोर आले आहे.
 
 
 
महाबळेश्वर घाट परिसरात मुसळधारा पाऊस सुरू आहे. परिणामी या घाट परिसराला लागून असलेल्या गावांमध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे. महाड मधील तळेय, पााटण तालुक्यातील कोंढवळे, साताऱ्यातील आंबेघर आणि कोयना अभयारण्य परिसरातील मिरगावमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये तळये गावातील दुर्घटनमध्ये ३९ आणि आंबेघर गावामध्ये १२ लोकांचा मृत्यू झाल्याचे समजतंय. तळये गावातील घटना ही गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता घडली. यामध्ये जवळपास ३५ घरांवर दरड कोसळली. अशा परिस्थितीत या गावाला शुक्रवारी १ वाजता मदता मिळाली. एनडीआरएफचे पथक या गावात पोहोचण्यापूर्वीच भाजपचे प्रविण दरेकर आणि गिरिश महाजन या गावात चालत पोहोचले होते. आम्ही दुुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तीन तासांनी एनडीआरएफचे पथक याठिकाणी पोहोचल्याची माहिती महाजन यांनी दिली.
 
 
 
शुक्रवारी सकाळी तळयेच्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाडमध्ये पाहणी करत असलेले महाजन आणि दरेकर या गावाच्या दिशेने निघाले. अर्ध्या वाटेवर पोहोचल्यानंतर त्यांना तलाट्यांनी गावाकडे जाणारा रस्ता खचल्याची माहिती दिली. अशा परिस्थितीत भाजप नेत्यांनी या गावाकडे चालत जाण्याचा निर्णय घेतला. गावात पोहोचल्यानंतर आम्ही मृतदेहांचा खच पाहिल्याचे महाजन म्हणाले. शुक्रवारी संध्याकाळी घटना घडल्यानंतर तळये गावातील पुणे आणि मुंबईत राहणारी मुलं या गावात मदतीसाठी पोहोचली. मात्र, प्रशासन याठिकाणी पोहचू शकले नाही, ही गोष्ट अत्यंत दुदैवी असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. 
Powered By Sangraha 9.0