टोकियो ऑलिम्पिक २०२१ : पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या प्रवीणची कमाल

23 Jul 2021 21:02:02

Olympic_1  H x
 
 
टोकियो : अनेक महिने चर्चेत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकला अखेर शुक्रवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारताच्या तिरंदाजांनी चांगली सुरुवात केली. महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने पहिल्याचा दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पात्रता फेरीत त्याने अतानुपेक्षा अधिक गुण मिळवले. यामुळे आता तो मिश्र दुहेरीत तो दीपिका कुमारी २४ जुलैला मैदानात येणार आहे. पुरुषांच्या वैयक्तिक गटात पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या प्रवीणने तरुणदीप आणि अतानुपेक्षा चांगली कामगिरी केली. ६४ तिरंदाजांमध्ये तरुणदीप ३७व्या तर अतानु ३४व्या स्थानावर राहिले. प्रवीणने पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करत ३१वे स्थान पटकावले.
 
 
नियमांनुसार वैयक्तिक गटात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणाऱ्या तिरंदाजांचे गुण एकत्र करून मिश्र दुहेरीसाठीची क्रमवारी ठरवली जाते. भारताकडून महिला गटात फक्त दीपिका कुमारीने भाग घेतला आहे. तिने ६६३ अंकांसह नववे स्थान मिळवले आहे. तर पुरुष गटात अतानु दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप रॉय यांनी सहभाग घेतला होता. स्टार खेळाडू असलेल्या अतानुला मागे टाकत प्रवीण जाधवने ६५६ अंकांसह ३१ वे स्थान मिळवले. ६५३ अंकासह अतानुला ३५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जाधव आणि दीपिकाच्या अंकांच्या जोरावर भारताला नववे स्थान मिळाले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0