साताऱ्यात आंबेघर गावात कोसळली दरड ; १०हून अधिक जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2021
Total Views |
 
satara_1  H x W
 
 
 
 
सातारा : गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यात मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचबरोबर साताऱ्यातील अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोंडावळे या गावात गुरुवारी रात्री दरड कोसळून तब्बल २५ घरे गाडली गेली आहेत. तर, दुसरीकडे पाटण तालुक्यातील मिरगाव गावावरदेखील दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
 
 
मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत अंदाजे १५ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी १२ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप ३ कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, याठिकाणी अद्यापही मदतकार्य सुरु असल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
 
 
 
दरम्यान, या सलग पडणाऱ्या पावसामुळे पाटण तालुक्यातील मिरगाव गावावर दरड कोसळून ७ ते ८ घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तसेच, पंधरा ते वीस घर घरांचे नुकसान झाले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे गावात एकच गोंधळ उडाला. यातून एका कुटुंबाला बाहेर काढण्यात यश आले असून या कुटुंबातील एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या गावाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने मदतकार्यात अडथळा येत असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
 
तसेच, जिल्ह्यातील कोंडावळे या गावात दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये पंचवीस घरे ढिगाऱ्याखाली गेल्याची माहिती आहे. डोंगर तुटल्याचे आणि गावाकडे सरकत येत असल्याचे मोठे आवाज काही ग्रामस्थांना ऐकू आले आणि ही ग्रामस्थ मंडळी घरातून बाहेर पळत सुटली. यामुळे अनेक नागरिक या मोठ्या दुर्घटनेतून वाचली. या दुर्घटनेत जवळपास २५ घरे गाडली गेली तर २७ लोक बाहेर काढली आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@