कोकणात गणेशोत्सवासाठी अजुन ४० गाड्यारेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2021
Total Views |

raosaheb danve_1 &nb

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण आणि राज्यातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकणात अतिवृष्टी झाल्याने कोकणवासियांचे बरेच नुकसान झाले आहे. अशात मुंबई आणि कोकणात रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली आहे. या अनुषंगाने कोकणातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा पुर्ववत करण्यासाठी आणि कोकणवासियांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल, असे दानवे म्हणाले.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचे केंद्रीय मंत्री दानवे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पावसाचे पाणी रूळावर साचल्याने काही भागातील रेल्वे वाहतूक थांबली आहे. अशात प्रवाशांची गैरसोय होवू नये याकरिता कसारा, बदलापूर आणि इगतपूरीवरून रेल्वे विभागाकडून प्रवाशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पुरामुळे रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना सर्वप्रथम सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम रेल्वे प्रशासन करेल.
प्रशासनाला पुर्ण खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. धोका पत्करून आणि भावनेच्या आहारी जावून रेल्वे प्रशासन कुठलाही निर्णय घेणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारे केंद्राकडे पाठवला तर, केंद्र सरकार नक्कीच त्यावर विचार करेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या अतिरिक्त ४० फेऱ्या
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत यंदा गणेश उत्सवादरम्यान चाकरमान्यांसाठी मुंबईवरून विशेष गाड्यांच्या ७२ फेऱ्या केल्या जातील. मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, पुनम महाजन तसेच आमदार आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर अतिरिक्त ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजून गरज पडल्यास रेल्वे प्रशासन यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला जाणार जाईल, असे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@