मशिदीवरील बेकायदा भोंग्यांविरोधातला 'आवाज' आता मोठ्या पडद्यावर ; एकदा पहाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021
Total Views |

BHonga_1  H x W
 
 
 
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘भोंगा’ या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली. हल्लीच चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून, या पार्श्वभूमीवर हा ‘भोंगा’ चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, टिझर मध्ये दाखवल्याप्रमाणे धर्मापेक्षा मोठे कोणी नाही मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल या वृत्तीला दडपून टाकण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक विषयांवर आधारित नवनवीन उत्तम चित्रपट येत आहेत, असाच एक विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला ‘भोंगा – अजान’ नावाचा चित्रपट भेटीला येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते 'शिवाजी लोटन पाटील' यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
 
 
 
 
 
 
टीझरमधून चित्रपटाच्या कथेचा अंदाज
 
 
ध्वनी प्रदूषण आणि धर्म याविषयावर गल्लत करणाऱ्या मुस्लिम धर्मातील कट्टरपंथीयांवर नेमकेपणाने आसूड उगारण्यात आलेल्या या सिनेमाच्या टीझरला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एका कुटुंबातील ९ महिन्यांच्या बाळाला दुर्धर आजार झालेला असतो. मशिदीत भोंग्याच्या आवाजामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होत असतो. परिणामी बाळाचा त्रास वाढत जातो. त्यामुळे मशिदीवरील भोंगा बंद करण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न आणि त्याला होणार विरोध याची गोष्ट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी मांडली आहे. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे, या सिनेमाची निर्मिती अमोल कांगणे यांनी केली आहे. २४ सप्टेंबर रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्र राज्याचा ‘सर्वोत्तम चित्रपट’, ‘सर्वोत्तम ग्रामीण चित्रपट’ आणि ‘सर्वोत्तम दिग्दर्शक’ हे पुरस्कार मिळाले आहेत.
 
 
मानखुर्दमध्ये भोंग्यावर महापालिकेची कारवाई!
 
 
 
मानखुर्द येथे राहणारी करिष्मा भोसले या तरुणीने तिच्या घराच्या बाजूला एक खांबावर मशिदीचा भोंगा लावण्यात आला होता, म्हणून त्याला तिने पोलिस ठाण्यात जाऊन विरोध केला. तेव्हा तिला स्थानिक मुसलमानांनी ‘भोंग्याचा त्रास होत असेल तर घर बदला’, अशी धमकी दिली. पोलिसही तक्रार लिहून घेत नव्हते. त्यानंतर यावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि करिश्माला मोठा पाठिंबा मिळाल्यावर अखेर महापालिकाने हा भोंगा तेथून हटवला.
 
@@AUTHORINFO_V1@@