आता लोकल सुरू करा अन्यथा... : राज ठाकरेंचा इशारा

    दिनांक  22-Jul-2021 14:34:34
|

rAJ _1  H x W:


मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही घट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन पुन्हा रुळावर येत आहे. नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.


कोरोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे. या मुद्द्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावलं उचलण्याची मागणी करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.