चीन तिबेटियन लोकांना 'pla' मध्ये भरती करत आहे,सावध ऐका...

    दिनांक  22-Jul-2021 13:14:48
|

army_1  H x W:नवी दिल्ली :
युद्धात जो उंचावर त्याचा विजय होतो असे मानले जाते,त्यामुळे जगाच्या दोन महासत्ता यांमध्ये सुरु असलेल्या युद्धालाही उंच प्रदेश कलाटणी देऊ शकतो. ते दोन महासत्ता म्हणजे भारत आणि चीन आणि तो उंच प्रदेश म्हणजे तिबेट आहे. हे चीनने ओळ्खल्यामुळे अशा जास्त उंचीच्या ठिकाणी लढण्यासाठी तिबेट मधल्या युवकांना आपल्या सैन्यात प्रवेश देत आहे. जेणेकरून अशा उंच ठिकाणी ते भारताबरोबर ते लढू शकतील.

चीन असा प्रयत्न करत आहे की तिबेट मधला प्रत्येक पालक आपल्या एका मुलाला तरी pla मध्ये सामाविष्ट करेल. त्यासाठी त्यांना अनेक विशेष भत्यांची ऑफर दिली जात आहे. भारताच्या सीमेलगत असणाऱ्या प्रत्येक भागातून चीन अनेक युवकांची भारताविरोधात फळी उभी करत आहे. त्याचबरोबर भारताविरोधात सीमेलगत चीन अनेक नवीन आणि अत्याधुनिक शस्त्रे उभी करत आहे. त्यामुळे भारताने सावध राहणे गरजेचे आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.