विरोधकांनी ‘वैचारिक काविळी’तून बाहेर यावे; खासदार विनय सहस्रबुद्धेंचा टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2021
Total Views |
vs_1  H x W: 0



डॉ. सहस्रबुद्धे यांनी  करोनाविषयक चर्चेत विरोधकांवर साधला निशाणा
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशातील काही राजकीय पक्षांची अजब तऱ्हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही आवाहन केले, की त्याविषयी आक्षेप नोंदविण्यात येतो. त्यामुळे विरोधी पक्षांनी अशा प्रकारच्या 'वैचारिक काविळी'तून (आयडियॉलॉजिकल जॉन्डिस) बाहेर यावे, असा टोला भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी लगाविला.
 
राज्यसभेत करोनाविषयक चर्चेदरम्यान डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी पंतप्ररधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या करोनाविरोधी लढ्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
 
 
चर्चेदरम्यान प्रत्येक सदस्याने फ्रंटलाईन वर्कर आणि कोव्हिड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, ते अगदी योग्य आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांनीदेखील पहिल्या लाटेदरम्यान फ्रंटलाईन वर्कर आणि कोव्हिड योद्ध्यांप्रती देशाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवे, दिप लावण्याचे आवाहन केले होते. देशातील जनतेने त्यास मोठा प्रतिसादही दिला होता. मात्र, त्यावेळी आज कृतज्ञता व्यक्त करणारे त्या आवाहनाची खिल्ली उडविण्यात व्यस्त होते. पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतील आक्षेप घेण्याचा वैचारिक काविळ अनेकांना झाला आहे, त्यांनी त्या वैचारिक काविळीतून लवकरात लवकर बाहेर यावे; असा टोला डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी लगाविला.
 
 
 
 
 
 
करोना लस घ्यायची की नाही, ही प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, अनेक पक्षांच्या नेत्यांनी करोना लशीला मोदी व्हॅक्सिन असे संबोधून ती घेणार नसल्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यामुळे देशातील नागरिकांची दिशाभूल झाली. मात्र, मी त्या नेत्यांना सांगू इच्छितो की लस घ्यायची की नाही, हा तुमचा निर्णय आहे. कारण करोना लसीकरण कार्यक्रम म्हणजे आणिबाणीप्रमाणे जबरदस्तीने नसबंदी करण्याचा कार्यक्रम नाही, असेही डॉ. सहस्रबुद्धे यांनी नमूद केले.
 
 
 
खर्गे, राऊतांसोबत असूनही पवारांनी दाखवली समजदारी
 
 
पंतप्रधानांच्या टाळ्या वाजविण्याच्या आवाहनास शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासह आपल्या घराच्या अंगणात येऊन फ्रंटलाईन वर्कर्स आणि करोना योद्ध्यांसाठी टाळ्या वाजविल्या होत्या. विशेष म्हणजे राज्यसभेत ते काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासोबत बसतात, तरीदेखील त्यांनी समजदार भूमिका घेतली यासाठी त्यांचे अभिनंदन करतो, असेही डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@