रामसेतू राष्ट्रीय स्मारक बनेल का ?

    दिनांक  02-Jul-2021 17:35:58
|

ramsetu_1  H xरामेश्वरम : मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्री रामचंद्राने सीतामाईची लंकेतून सुटका करण्यासाठी वानरसेनेने रामसेतू निर्माण केला. हा रामसेतू हिंदू धर्मीयांच्या श्रधास्थानाचा विषय आहे. याच रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी आता भारतातर्फे केली जात आहे. रामसेतूची महती वेगळी सांगण्याची गरज नाही.
देशातील लिबरल विचारसरणीने कायमच या सेतूचा इतिहास मानण्यास विरोध केला. ज्यांनी रामाला विरोध केला त्यांनीही या रामसेतूला पौराणिक मानण्यास विरोध केला. ज्यांनी रामसेतू काल्पनिक आहे असं म्हटलं, मुळात रामायणाच काल्पनिक आहे, असंही म्हटलं मग रामसेतूचा विषय कोठून आला? असे म्हणणाऱ्या कित्येक व्यक्तींना नासाने जरी पुरावे दिले तरीही त्याला जुमानत नाहीत.
६ महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने रामसेतूची वैज्ञानिक पडताळणी करण्यासाठी परवानगी दिली.काही महिन्यात याविषयी अजून माहिती आपल्याला मिळेल परंतु डिस्कवरी ऑफ सायन्स चॅनलने एक विडिओ ट्विट केला आहे, यात त्यांनी वैज्ञानिक रित्या हे सिद्ध केले कि रामसेतू हा मानवनिर्मित आहे. मानवनिर्मित हे सांगताना त्याचे अनेक पुरावे आहेत. कापलेले दगड,त्या भागात न आढळणारे दगड इत्यादी... , आणि तेथील दगडांचे वेगवेगळे कार्बन डेटिंग नंतर आढळून येणारे आयुमान इत्यादी.. या अशा अनेक पुराव्यावरून हा मानवनिर्मित आहे या तर्कापर्यंत पोहोचता येते.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याबद्दल एक ट्विट नुकतेच केले आणि हा विषय पुन्हा चर्चेत आला. यावरील सुनावणी सर्वोच्च न्यालयात सुरू आहे. केंद्र सरकार सुद्धा यात अग्रेसर आहे. परंतु जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही. तोपर्यंत केंद्र सरकार यात हस्तक्षेप करू शकत नाही.
भौगोलिक दृष्ट्या रामसेतू हा भारताच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या तामिळनाडू राज्याच्या जवळ आहे, तिथे एक बेट आहे ज्याचे नाव आहे, रामेश्वरम... रामेश्वरम हे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे कलाम यांचे गाव. त्या बेटावरून भारताला आणि श्रीलंकेला जोडणारा एक सेतू आहे तोच हा रामसेतू .या विभागला पालची सामुद्रधुनी असेही म्हणतात. ३५ किलोमीटर लांब असा हा सेतू आहे. अनेक भागात याला ऍडम्स ब्रिज असेही म्हणतात.
ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून याचे वेगळे महत्वव आहे, अशा रामसेतूला तोडून तिथे खनन कार्य करून जहाजांची येजा करण्यासाठी तेथील समुद्र खोल करावा अशी याचिका सर्वोच्च न्यालयात दाखल केली गेली होती हे खनन करणाऱ्या प्रकल्पाला नाव दिले होते 'सेतु समुद्रम शिपिंन्ग कॅनल प्रकल्प' ,यावर न्यायालयात धाव घेत भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याला विरोध केला. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने कोणताही हिंदू तिथे पूजेसाठी जातो का? असा प्रश्न विचारला होता, त्यावर खासदार स्वामी यांनी दिलेले उत्तर काय होते तर स्वामी म्हणाले, हिंदू धर्मात सूर्याची उपासना केली जाते, त्यासाठी सूर्यावर जाऊन पूजा करण्याची गरज नाही. असेच रामसेतूचे आहे ,रामसेतू श्रद्धास्थान आहे.
सेतुसमुद्रम प्रकल्पामुळे तेथील पर्यावरणही दूषित परीणाम होतात.याचा विचार करून पर्यावरणावरील ह्याच्या परिणामाचा विचार करून आम्ही निर्णय देऊ, असे सर्वोच्च न्यालयाने सांगितले, म्हणजे याचा अंतिम निर्णय अजूनही आला नाही आहे. जर आपल्याला तेथील पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर त्वरित आपल्याला यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे लागेल.
पुरातत्व विभागानुसार, राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचे काही प्रमाणे आहेत. या सर्व अटी रामसेतूला लागू आहेत. जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नुसार रामेश्वरम बेट हे १,२५,०० हजार वर्षांपूर्वीचे आहे. तर रेडिओकार्बोन डेटिंग पद्धतीवरून रामसेतू जो रामेश्वरम ते तलाईमारपर्यंत जातो. तो ७००० ते १८००० वर्षांपूर्वीचा आहे. या व अशा अनेक गोष्टीवरून एक गोष्ट सिद्ध होते कि हा सेतू मानवनिर्मित आहे आणि हजारो वर्षांपूर्वी हा सेतू बांधणे हे भारताच्या उज्ज्वल इतिहासाचे प्रतीक आहे. त्यामुळे पर्यावरणाला वाचविण्यासाठी, भारताच्या इतिहासाला वाचविण्यासाठी, भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी हा सेतू राष्ट्रीय स्मारक म्हणू घोषित करणे गरजेचे आहे. तसेच युनेस्कोतर्फेही जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासाठीही आपण प्रयत्नशील व्हायला हवं. तुम्हाला हा व्हीडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे आमचं युट्यू चॅनला सबस्क्राईब करा आणि फेसबूक चॅनलला लाईक करा. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.