पुलवामामध्ये सुरक्षादलाने घातले ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

02 Jul 2021 19:44:13

JK_1  H x W: 0
 
जम्मू काश्मीर : शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, "सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दोन जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी एक लष्कर-ए-तोयबाचा जिल्हा कमांडर निशज लोणे आणि दुसरा पाकिस्तानी दहशतवादी आहे."
 
 
 
या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवानदेखील हुतात्मा झाला. राजपोरा भागातील हंजिन गावामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला देण्यात आली होती. यावेळी त्वरित सुरक्षा दलाने शोध मोहीन सुरु केली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमकीला सुरुवात झाली. तसेच, बुधवारी कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. यामध्ये २ दहशतवादी ठार झाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0