विमान अपघात झाला अन् त्यांना देव भेटला! : वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2021
Total Views |

plane 1_1  H x
 
 
 
जळगांव : जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावानजीक सातपुडा पर्वतात काल अचानक एक छोटे विमान कोसळले. परंतु आजूबाजूच्या परिसरातील मजूर शेतकरी वर्ग असल्याने त्यांना मोठा आवाज ऐकू आला व त्यांनी त्या दिशेने धाव घेतली व बचावकार्य सुरू केले.
 
 

plane 2_1  H x
 
 
दाट झाडी आणि रस्ता नसल्यामुळे घटनास्थळी पोहचण्यासाठी खूप अडचणी आल्या.
 
 
 
plane 3_1  H x
 
 
घटनास्थळी आल्यानंतर लोकांना काय करावे हे सुचेना. तेव्हा त्यांनी गावात फोन करून याची माहिती दिली. काही वेळानंतर पोलिसही आले. थोड्या वेळात रुग्णवाहीकेशी संपर्क झाला परंतु मुख्य रस्त्यापर्यंत ३ ते ४ किमी अंतर पायी जावे लागणार होते.
 
 
 
plane 4_1  H x
 
 
 
तेव्हा बांबूंना कापड बांधून त्यात जखमींना घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू झाले. उपस्थित तरुणांनी अंगावरील शर्ट फाडून बांबूला झोळी बांधली व तात्काळ जखमींना रुग्णवाहीकेपर्यंत जाऊन दिले.
 
 
 
plane 5_1  H x
 
 
विमानात असलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर वैमानिक तरुणी गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेत नागरिकांनी जे प्रसंगावधान व तत्परता दाखवली ती खरोखर कौतुकास्पद अशी आहे. आपण बऱ्याचदा असे काही अपघात किंवा घटना घडल्यानंतर उदासीन समाजभान बघतो. परंतु वर्डी येथील नागरिकांनी मानुसकी व परोपकाराचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@