ठाण्यातही पावसाचे बळी ; कळव्यात घरांवर दरड कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यु

19 Jul 2021 19:30:32

thane_1  H x W:
 

ठाणे : शनिवारपासुन मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी अखेर बळी घेतले. कळव्यातील घोलाईनगर डोंगरावर वसलेल्या घरांवर भुस्खलन होऊन दरडी कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असुन यातील दोघे जखमी आहेत. मृतामध्ये दांपत्यासह तीन मुलांचा समावेश आहे.
 
 
ही दुर्घटना कळवा पूर्वेकडील चर्च रोड, घोलाईनगर येथील दुर्गा चाळीत घडली.घटनास्थळी ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि टीडीआरएफ पथक बचावकार्य करीत आहे. घोलाईनगर परिसरात भूमाफियांनी वनविभाग व स्थानिक प्रशासनाला न जुमानता डोंगर माथ्यावर अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या आहेत. त्यामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही वर्षापुर्वी देखील अशीच दुर्घटना घडली होती.
 
 
मृतांची नावे -
 
 
प्रभु सुदामा यादव (४५), पत्नी विद्यावती प्रभु यादव (४०),सिमरन यादव (१०),रविकिसन यादव (१२) आणि संध्या यादव (३)
 
 
जखमींची नावे -
 
 
आंचल यादव (१८) आणि सोना उर्फ प्रिती यादव (५ )
 
 
 
Powered By Sangraha 9.0