‘नेल्सन मंडेला’ यांच्या जीवनावरील लघुपट पाहण्यासाठी क्लिक करा!

18 Jul 2021 15:06:20

nelson mandela _1 &n
 

नवी दिल्ली : वर्णभेदविरोधी चळवळीचे प्रणेते आणि नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त नेते नेल्सन मंडेला यांच्या १०३ व्या जन्मदिनानिमित्त १८ जुलै २०२१ रोजी 'आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन' साजरा केला जाणार आहे यानिमित्त फिल्म डिव्हिजनच्या वतीने मंडेला यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
 
 
 
 
फिल्म्स डिव्हिजनच्या https://filmsdivision.org/ या संकेतस्थळावर ,'डॉक्युमेंटरी ऑफ द वीक ” या विभागाअंतर्गत या महान नेता-राजकारणी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यावर एक लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. हा लघुपट फिल्म डिव्हिजनची यूट्यूब वाहिनी, https://www.youtube.com/user/FilmsDivision वर देखील पाहता येईल.
 
 
 
 
‘नेल्सन मंडेला: स्वातंत्र्याचा मसीहा’ (इंग्रजी / 1991/14 मि / व्ही. पॅकरीसॅमी) हा लघुपट वर्णभेदाविरूद्धच्या लढ्यात लोकांचे नेतृत्व करत २७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर १९९४ च्या निवडणुकीत आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसला विजय मिळवून देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या महान नेत्याचे जीवन आणि संघर्ष अधोरेखित करतो. १९९० साली नेल्सन मंडेला भारत दौऱ्यावर आले होते लघुपटात त्यांचा भारत दौरा आणि भारतीय लोकांकडून मिळालेला सर्व प्रकारचा आदर आणि आपुलकी याचे चित्रणही या लघुपटात आहे.







Powered By Sangraha 9.0