इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब : अमृता फडणवीस

16 Jul 2021 14:57:35

amruta _1  H x


मुंबई : रात्रभर कोसळेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. शुक्रवारी दुपारनंतर उसंत घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला मात्र, नालेसफाईच्या कामांमध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे मुंबईची तुंबई हा नित्याचा विषय झाला आहे. सामाजिक कार्यकत्या आणि गायिका अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर दोन ओळीत आसूड ओढला आहे. 


"इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !, असे म्हणत त्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तुंबलेल्या रस्त्यावरचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.




Powered By Sangraha 9.0