VIDEO : भारताशी चर्चा करू पण संघाची विचारधारा आड येते : इमरान खान

    दिनांक  16-Jul-2021 15:27:21
|

Imran Khan _1  

इस्लामाबाद : "चर्चा आणि दहशतवाद एकत्र सुरू राहू शकते का", असा प्रश्न एनएनआयच्या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांना विचारला. त्यावेळी पुन्हा एकदा आपल्या पठडीतील उत्तर देऊन इमरान खान यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तालीबानच्या प्रश्नावरही इमरान खान यांची बोलती बंद झाल्याचे दिसून आले.
 
 
 
चर्चा आणि दहशतवाद एकत्र सुरू राहू शकतात का, असा प्रश्न इमरान खान यांना विचारण्यात आला. त्यावेळी खान म्हणाले की, भारताशी आम्ही कित्येक वर्षांपासून चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र, संघाची विचारधारा आमच्या आड येत आहे, अशी टीका इमरान खान यांनी केली आहे.
 
 
त्याला उत्तर देण्याचा पत्रकाराने प्रयत्न केला. पण थेट पळ काढण्याचा प्रयत्न केला. तुमच्यावर तालीबानवर ताबा मिळवण्यावरून इमरान यांच्यावर आरोप लागले आहेत, असा जाब विचारण्याचा पत्रकाराने प्रयत्न केला परंतू, पळ काढणाऱ्या इमरान खान यांनी पुन्हा एकदा या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.