एंजेल ब्रोकिंगचे आर्थिक वर्ष'२२ च्या पहिल्या तिमाहीचे परिणाम जाहीर

    दिनांक  16-Jul-2021 18:31:03
|

Angel _1  H x W
मुंबई : एंजेल ब्रोकिंग लिमिटेडने ३० जून २०२१ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीचे परिणाम जाहीर केले. आर्थिक वर्ष २०२१च्या चौथ्या तिमाहीच्या रु. ४१८९ दशलक्षच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न रु. ४७४५ दशलक्ष झाले आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर यात १३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
कंपनीने ईबीटीडीएमध्ये १४% टक्क्यांची त्रैमासिक वृद्धी घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२१च्या चौथ्या तिमाहीच्या रु. १४६३ दशलक्षच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत ते रु. १६६३ दशलक्ष झाले आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे ईबीटीडीए मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या % नुसार) ४९% वर स्थिर राहिले आहे. कंपनीचा कर पश्चात नफा गतवर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या रु. १०२० दशलक्षच्या तुलनेत त्रैमासिक १९% वृद्धीसह यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत रु. १२१४ दशलक्ष झाला आहे.
 
एंजेल ब्रोकिंगने पहिल्या तिमाहीत १.२ दशलक्ष नवीन ग्राहक जोडणी केली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत यात २६%ची वाढ झाली आहे. कंपनीने नवीन ग्राहक जोडणीमध्ये वार्षिक २४७% वाढ नोंदवली आहे. कंपनीची एनएसईवरील सक्रिय ग्राहकांची संख्या गेल्या तिमाहीच्या तुलनेत २१% वाढीसह ०.४ दशलक्षवर पोहोचली आहे. ही वाढ वार्षिक ११८% राहिली आहे. कंपनीने या तिमाहीत २४८.५ दशलक्ष इतक्या सर्वोच्च व्यवहारांची नोंद केली असून गेल्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ १४% तर वार्षिक ९३ टक्के आहे.
 
एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री दिनेश ठक्कर म्हणाले, “Q1 ‘22 ही तिमाही या क्षेत्रासाठी आणि एंजेल ब्रोकिंगसाठी अनेक अर्थांनी दमदार ठरली. टीअर २, ३ आणि त्यापलिकडील शहरांमधील जास्तीत जास्त लोकांनी संपत्ती निर्माणासाठी इक्विटीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळेच आम्ही वृद्धीच्या दिशेने आहोत, असा आत्मविश्वास वाटतोय. उच्च वृद्धीचा हा प्रवास मध्यम आणि दीर्घकाळासाठी असाच राहील. कारण एंजेल ब्रोकिंग जास्तीत जास्त प्रसारासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
 
एंजेलच्या या वृद्धीला आमचे डिजिटल फर्स्ट आणि फिनटेक बिझनेस मॉडेलमधील परिवर्तनाचे बळ मिळाले आहे. ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणवर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर केला. आम्ही अजून उत्पादने तयार केली आणि आमच्या सुविधांमध्येही सुधारणा केली, त्यामुळे आम्ही स्वत:कडे ‘एंजेल ब्रोकिंग’ वरून ‘एंजेल वन’ या स्वरुपात पाहत आहोत.” गुंतवणूक आणि संपत्ती निर्माणातील आमचे प्रयत्न सोपे आणि अखंड आहेत. आमच्या डिजिटल टीमचा विस्तार करण्याचा विचार आहे. जेणेकरून आम्ही वृद्धीसंबंधी उपक्रमांना प्राधान्य देत असताना व्यवसायासाठी हे पूरक ठरेल.”
 
एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नारायण गंगाधर म्हणाले, “बहुतांश टीअर २, ३ आणि इतर शहरांपलिकडेही ग्राहक नोंदणीत मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, उच्च वृद्धीच्या निकषांवर आम्ही कायम राहत आहोत, हे पाहून खरोखरच आनंद होत आहे. पद्धतशीर संपत्ती निर्मितीच्या संकल्पनेतून भारत आक्रमकपणे पुढे येत असल्याने, फिनटेक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर वृद्धीची संधी दिसून येऊ शकते.
 
आमच्या प्लॅटफॉर्मवरील वाढता ग्राहक वर्ग आणि त्यांच्या उच्च पातळीवरील अॅक्टिव्हिटींद्वारे हेच दिसते की आम्ही त्यांना उत्कृष्ट डिजिटल अनुभव प्रदान करतो. यामुळे सर्व ग्राहकांसाठी अधिक कार्यक्षम आणि प्रभावी व्यापार सुलभ उत्पादने आणि सेवा प्रदान करतच राहूत. आम्ही नुकतेच, स्मार्ट-स्टोअर लाँच केले. नियम आधारीत गुंतवणूक समाधान, गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि संवादासाठी मंच, जिथे आमचे ग्राहक परस्परांशी संवाद साधू शकतील, अशा फिनटेक आधारीत उत्पादने आणि सेवांसाठीची ही एक बाजारपेठ आहे.
 
हाच विचार मनात ठेवत आम्ही ‘एंजेल वन’ हा एकछत्री ब्रँड तयार करत आहोत, जो आमच्या टार्गेट ग्राहकांच्या गरजा योग्य पद्धतीने पूर्ण करेल. कारण आम्ही ग्राहकांच्या संपत्ती निर्माणात भागीदार असून त्यांना डिजिटल पद्धतीने वित्तीय उत्पादने आणि सेवा पुरवतो
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.