सांगली : गेली २ वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत. यामुळे अद्यापही अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाला तर काय? मग आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचे काय? अश्या अनेक प्रश्नांच्या घेऱ्यात नागरिकांमध्ये भीती निर्माण होते.
कोरोना विषाणू हा घटक असला तरी त्यावर उपचार होऊन तो ठीक होऊ शकतो, अशा प्रकारची जनजागृती डॉक्टर आणि साकार दोघेही करत आहेत. मात्र, अद्यापही याबद्दलची भीती नागरिकांमधून बाहेर पडत नाही आहे. सांगलीमध्ये एका २८ वर्षीय तरुणाने कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने वाढदिवशीच स्वतःला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्यामुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित झाले आहे.
२८ वर्षीय निखील लक्ष्मण भानुसे हा सांगली येथे राहत होता. निखील हा व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होता. ४ दिवस आधी त्याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. यामुळे तो प्रचंड अस्वस्थ झाला. याचा नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ महिन्यांपूर्वी निखीलचे झाले होते. कोरोनाची भीती मनात बसल्यामुळे बुधवारी रात्री घरासमोरील जनावरांच्या शेडमध्ये गळफास लावून घेतला. अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.