मुंबई : एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असून महाविकास आघाडी सरकारने अद्यापही महाराष्ट्रभर निर्बंध उठवलेले नाही. अशामध्ये अनेकवेळा महाविकास आघाडीमधील नेत्यांचा मानअपमान, नाराजीनाट्याच्या बातम्या येत असताना. यावर आता प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विट केले आहे की, “राजकीय लोकांची नाटके सुरु मात्र रंगभूमीवरील नाटकांना मनाई” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
“राजकीय लोकांची जोरदार नाटकं सुरू असताना झालेल्या गर्दीत कोरोना गुदमरून मरतो. पण रंगभूमीवर आमच्या नाटकांना मात्र कोरोनाची भीती दाखवून मनाई.” असे केदार शिंदे यांनी म्हंटले आहे. तसेच, रंगभूमी पुन्हा सुरु करा अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. गेले २ वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्यक्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांसाठी नात्यागृहांना अटींवर परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता महाराष्ट्रभर नाट्यगृह ठप्प आहेत.
पुढे त्यांनी म्हंटले आहे की, “याठिकाणी आणि त्याठिकाणी… एवढच म्हणत, सामान्य माणसाला या राजकीय नेत्यांनी जिथल्या तिथेच ठेवण्याचा चंग बांधला आहे… टेनिस, फुटबॉल, क्रिकेट सामने पाहणारे परदेशी प्रेक्षक मास्क शिवाय पाहिल्यावर वाटते की, कोरोनासाठी आपली तोंड बंद केली आहेत की, आपल्याला बोलूच द्यायाचे नाही आहे?” असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.