मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानाने नुकताच इन्स्टाग्रामवर आसाममधील कामाख्या देवीच्या दर्शनाचे काही फोरो शेअर केले. फोटोंमध्ये सारा पांढ-या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे. तर, गळ्यात आसामचा पारंपरिक स्कार्फ असून माथ्यावर टिळा लावलेला आहे. यावरून काहींनी तिचे कौतुक केले, तर कट्टरपंथीयांनी मात्र तिच्यावर सडसडून टीका केली. काहींनी तर तिला चक्क धर्माची जाण ठेव, असेदेखील म्हंटले आहे.
सारा अली खान हे नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने आसाममधील सुप्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिली. याचे काही फोटो तिने सोशल मिडीयावर टाकले. त्यानंतर ‘तू मुस्लीम आहे की हिंदू?’ असा प्रश्न काही युझर्सनी विचारला. काहींनी तर ‘मुसलीम व्हा, अल्लाह कधीच यावर माफी देणार नाही. काही श्वासांचे हे आयुष्य आहे, नंतर अल्लाहसमोरच हजार व्हायचे आहे. असले वाईट कृत्य टाळा, अल्लाह तुम्हाला आशीर्वाद देईल.’ असे एका युझरने म्हंटले आहे.
एका युझरने म्हंटले आहे की, ‘नाव मुस्लीम आणि ओळख हिंदू. कृपा करून कुठला तरी एक धर्म निवड.’ असे म्हंटले. तर एकाने, ‘मुलीला एवढीही सूट देता कामा नये. माहित नाही तुझा बाप कसा या गोष्टींसाठी परवानगी देतो.’ असे म्हणत अप्रत्यक्षपणे सैफ अली खानलादेखील ट्रोल केले आहे. याआधीही अशाच कारणाने सारा ट्रोल झाली आहे. गंगा आरतीत सहभागी झाल्यावरून लोकांनी तिला असेच ट्रोल केले होते. काही महिन्यांपूर्वी सारा तिची आई अमृता सिंगसोबत अजमेर शरीफला गेली होती. त्याचे फोटोही तिने शेअर केले होते.